23 September 2020

News Flash

संतापजनक : वर्धा जिल्ह्यातील पुलगावलगत अल्पवयीन बालिकेवर बलात्कार

दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्धा जिल्ह्यातील पुलगावलगत एका वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर तीन दिवसांपूर्वी बलात्कार झाल्याची घटना आज उघडकीस आली असून, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरूवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पुलगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या वसाहतीत पीडितेचे कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबाशी परिचीत असलेल्याच तिघांनी या बालिकेला गुरूवारी रात्री घरी कोणी नसतांना बाहेर नेले व जवळच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. बालिकेने घरी आल्यावर ही बाब सांगितली. मात्र आई-वडिलांनी समाजाच्या धाकाने या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र या वस्तीशी संबंधित देवळी येथील एका युवकाने सामाजिक कार्यकर्त्या मंगेशी मून यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली.

यानंतर मून यांनी आज तडकाफडकी या वस्तीला भेट देवून कुटुंबाशी संवाद साधला. त्यावेळी हा संतपाजनक प्रकार उघड आला. सदर कुटुंब पोलीसांकडे भीतीपोटी जायला तयार नव्हते. त्यावेळी मून यांनी त्यांचे समुपदेशन करत तक्रार करण्यास त्यांना तयार केले. यानंतर तात्काळ पुलगाव पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्यात आली. पीडित कुटुंबाने आरोपींबाबत माहितीही दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 7:21 pm

Web Title: rape of a minor girl near pulgaon in wardha district msr 87
Next Stories
1 कृष्णा-पंचगंगेच्या महापुराचा धोका टळला; महाराष्ट्र व कर्नाटकातील मंत्र्यांचा दावा
2 बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने संताप
3 चंद्रपूर : बल्लारपूर शहरात भरदिवसा गोळीबार; कोळसा व्यावसायिक सूरज बहुरियाची हत्या
Just Now!
X