06 August 2020

News Flash

आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सलग दोन दिवस या मुलीला शेतात बांधून ठेवत अत्याचार करण्यात आले.

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीस दोन दिवस शेतात डांबून बलात्कार केल्याचा प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे घडला आहे. बलात्कार करणारा युवक आणि त्याला मदत करणारे चारही जण हे आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथील विद्यार्थिनी रविवारी वाण्याविहीरकडे येत असताना तिला पाच तरुणांनी अडवले. जवळील उसाच्या शेतात बळजबरीने ओढत नेत गणेश या संशयिताने बलात्कार केला. सलग दोन दिवस या मुलीला शेतात बांधून ठेवत अत्याचार करण्यात आले. अन्य चौघांनी या घटनेत संशयितास मदत केली. पोटात दुखू लागल्याची तक्रार मुलीने करताच भीतीमुळे संशयितांनी तिला रस्त्यावर सोडून दिले. घरी पोहचलेल्या मुलीने झालेला प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर मंगळवारी त्यांनी
अक्कलकुवा पोलीस ठाणे गाठले. परंतु त्रास होत असल्याने तत्काळ मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मुलीचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि संशयित एकाच आश्रमशाळेत शिकत असल्याची माहिती पुढे येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2015 1:20 am

Web Title: rape on ashram school girl
टॅग Ashram School
Next Stories
1 आता इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याची मागणी
2 कोकणात केरळीय शेतकऱ्यांचे वाढते प्रस्थ!
3 राज्याला पाऊस दिलासा!
Just Now!
X