News Flash

साडेतीन वर्षांच्या बालिकेवर इचलकरंजीत बलात्कार

इचलकरंजी येथील खंजिरे मळा परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर बलात्काराचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी रफिक बाबासाहेब जमादार (वय ४०) या विकृतास अटक करण्यात

| September 6, 2014 03:30 am

 इचलकरंजी येथील खंजिरे मळा परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर बलात्काराचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी रफिक बाबासाहेब जमादार (वय ४०) या विकृतास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोपी जमादार हा हरोली (ता. हातकणंगले) येथे राहण्यास आहे. त्याच्या इचलकरंजीतील खंजिरे मळा परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दुकानाशेजारी राहणारी एक मुलगी खेळत होती. जमादार याने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून दुकानात बोलावून घेतले. दुकान बंद करून त्याने बालिकेवर बलात्कार केला. हा प्रकार रात्री उशिरा पीडित बालिकेने आई-वडिलांना सांगितला. पालकांनी रात्री गावभाग पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांचे पथक आरोपी जमादार राहात असलेल्या हरोली गावात गेले. पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. आरोपी जमादार याच्यावर बलात्कार व बालकांचे लंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी दिली. पीडित मुलगी ही आरोपीच्याच समाजाची असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 3:30 am

Web Title: rape on three and a half years old child in ichalkaranji
टॅग : Child,Kolhapur
Next Stories
1 प्रवरा दुथडी भरून वाहू लागली
2 शिक्षक नेत्याचे आसूड, मंत्री-आमदारांचा ‘प्रचार’!
3 मंत्र्यांच्या दांडीमुळे शिक्षकांचा हिरमोड!
Just Now!
X