News Flash

गडचिरोलीत दुर्मिळ ‘काळा गिधाड’

गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात गिधाडांचे उपाहारगृह नव्याने सुरू करण्यात आले आहे

दुर्मिळ ‘काळा गिधाड’

पाकिस्तान, अफगाणिस्तानात वास्तव्य

गडचिरोली : जिल्हय़ात वनविभागाच्या वतीने गिधाडांचे संवर्धन व संरक्षण केले जात आहे. वनविभागाने मोठय़ा प्रमाणात जनजागृती केल्यामुळे नागरिकांमध्ये गिधाड पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण झाले असतानाच नुकतेच गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये आढळणारा दुर्मिळ ‘काळा गिधाड’ (सिनेरीस व्हल्चर) आढळून आला आहे. या काळय़ा गिधाडाला शिकारी पक्षी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे.

गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात गिधाडांचे उपाहारगृह नव्याने सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मृत पावलेली जनावरे टाकून गिधाडांना अन्न पुरवले जात आहे. पहिल्यांदाच मृत जनावर टाकल्यानंतर गिधाडमित्र अजय कुकडकर यांना अनेक गिधाड पक्षी निदर्शनास आले. यामध्ये एक काळय़ा रंगाचा मोठय़ा आकाराचा गिधाड पक्षी आढळून आला. या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी  दोन ते तीन दिवस परिसरात कुकडकर यांनी शोधमोहीम राबवली. यावेळी गिधाडमित्र अजय कुकडकर, मनोज पिपरे आणि छायाचित्रकार विपूल उराडे यांना सदर पक्षी निदर्शनास आला. त्याचे निरीक्षण केले असता ते दुर्मिळ व आपल्या भागात आढळून न येणारा काळा गिधाड असल्याचे दिसून आले. ‘सिनेरीस व्हल्चर’ हा गिधाडांच्या इतर जातींपैकी सर्वात मोठय़ा आकाराचा गिधाड असून त्याचे वजन १३ ते १४ किलो इतके असते. मृत जनावरांची चामडी काढण्याचे काम तो करतो. त्याला शिकारी पक्षी म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जम्मू, कश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान या प्रदेशात वास्तव्य करतो. पहिल्यांदाच या पक्ष्याची  गडचिरोली जिल्हय़ात नोंद झाल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे. वनविभागाच्या वतीने बोदली परिसरात तयार केलेल्या उपाहारगृहामुळे गिधाड पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणात आगमन होत आहे. या उपाहारगृहावर मृत जनावर टाकल्यानंतर चार दिवसांनी तब्बल २८ गिधाड आढळून आले असल्याची नोंद वनविभागाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:43 am

Web Title: rare black vulture found in gadchiroli
Next Stories
1 शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
2 ४१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा
3 चंद्रपुरातील पाणीपुरवठा दहा दिवसांपासून ठप्प
Just Now!
X