22 November 2019

News Flash

वर्षा बंगला थकीत पाणीपट्टी प्रकरण: राष्ट्रवादीचे भीक मागो आंदोलन

युवकांनी भीक मागून जमवली रक्कम; मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन

मुंबई महानगरपालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी भीक मागो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची कोट्यवधी रूपयांची पापाणीपट्टी थकली असल्याचा मुद्दा पकडत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सीएसएमटीसमोर भीक मागो आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर खाली बसून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले. दरम्यान, अनेकांनीही पैसे देत त्यांना पैसे दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. या बंगल्याचे साडेसात लाखांचे पाणी बिल थकले आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिले थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली होती.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडूही स्पष्टीकरण देण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या पाण्याची देयके नोव्हेंबर-2018 मध्येच भरण्यात आली होती. जुनी भरलेली देयके आणि मे-2019 मध्ये प्राप्त झालेल्या देयकांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे ही देयके अदा करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. संपूर्ण हिशोब केल्यानंतर ही देयके भरण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबई शहर इलाखा विभागाकडून सांगण्यात आले होते.

First Published on June 25, 2019 2:18 pm

Web Title: rashtrawadi yuvak congress bhik mango andolan csmt cm devendra fadnavis varsha bungalow defaulter list water billjud 87
Just Now!
X