News Flash

शिधापत्रिका तपासणी मोहीम स्थगित

पालघर जिल्ह्यातील १५ लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यातील १५ लाख शिधापत्रिकाधारकांना दिलासा

पालघर : ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी आहे, अशा सर्व लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या शिधापत्रिका तपासणी मोहिमेला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.  एकीकडे वृक्षतोड व महिलांना होणाऱ्या आजारांवर आळा बसण्यासाठी उज्ज्वल गॅससारखी योजना राबवत असताना दुसरीकडे गॅस जोडणी असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे कार्ड रद्द करण्याच्या दृष्टीने ही तपासणी मोहीम हाती घेतल्याचे आरोप होऊ लागल्याने राज्य सरकारने या तपासणीला स्थगिती दिली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील १५ लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी परिपत्रक काढून अपात्र शिधापत्रिका तपासणीची मोहीम फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान राबवण्याचा सूचना जारी केल्या होत्या. अपात्र शिधापत्रिका तपासणी करण्यासाठी नमुना फॉर्म तयार करून शिधा वाटप दुकाना मार्फत लाभार्थ्यांकडून भरून घेण्यात येत आहेत. या फॉर्ममध्ये आपल्याकडे असलेल्या गॅस जोडणी संदर्भातील तपशील भरावयाचा होता तसेच शेवटी उल्लेखित हमीपत्रामध्ये ज्यांच्याकडे गॅस जोडणी आहे, अशा लाभार्थ्यांची रेशन कार्ड रद्द करण्याबाबतचा अधिकार शासनाला देण्यावर स्वाक्षरी घेण्यात येत होती.

जिल्ह्यात सुमारे १४.५२ लाख प्राधान्य तर एक लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक असून यापैकी अनेक लाभार्थ्यांना कडे उज्वल गॅस जोडणी देण्यात आली आहे. अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेअंतर्गत गॅस जोडणी असणाऱ्या अशा शिधापत्रिका दारांचे कार्ड रद्द केल्यास जिल्ह्यातील कातकरी आदिवासी समाज तसेच गोरगरिबांवर उपासमारीची पाळी ओढवेल असे आहे श्रमजीवी संघटनेने सरकारच्या निदर्शनास आणून देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

शिधापत्रिका तपासणी मोहिमेला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही तर ही मोहीम रद्द करा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:02 am

Web Title: ration card inspection campaign postponed akp 94
Next Stories
1 शिक्षण विभागाकडून करोना निर्बंधांचे उल्लंघन
2 Maharashtra Corona : मृतांचा आकडा वाढला, दिवसभरात ३२२ मृत्यू, ५९ हजार ९०७ नवे करोनाबाधित!
3 उदयनराजे भोसले म्हणतात, “मलाच आता कळेना झालंय, राज्यात सुरू असलेलं राजकारण म्हणजे…!”
Just Now!
X