News Flash

अपात्र शिधापत्रिका रद्द होणार

शिधापत्रिकाधारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपात्र शिधापत्रिका रद्द होणार

क्षेत्रीय पुरवठा कार्यालयातर्फे शोधमोहीम

पालघर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पुरवठा कार्यालयामार्फत अपात्र शिधापत्रिका यांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील कार्यरत दारिद्र्य रेषेखालील (बी.पी.एल.), अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठीची शोधमोहीम फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये राबविण्याबाबतच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून संबंधित कार्यालयास देण्यात आल्या आहेत. अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत तपासणी करण्यासाठी त्या भागातील अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी, तलाठी यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येणार आहेत. हे फॉर्म विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करण्यात यावेत असे सूचित करण्यात आले आहे. हे फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा,  बँक पासबुक विजेचे देयक, टेलिफोन/मोबाइल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन/ इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, इत्यादीच्या प्रती सोबत द्याव्यात. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी तसेच या कामी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:21 am

Web Title: ration card search expedition by regional supply office akp 94
Next Stories
1 पशुधन मंडळाच्या कार्यालयाच्या स्थलांतरावरून वाद
2 रायगड जिल्ह्य़ातील अपघातांच्या प्रमाणात घट
3 माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
Just Now!
X