22 September 2020

News Flash

दापोली- खेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत. डंपरने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली- खेड मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत. डंपरने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

दापोली- खेड मार्गावर मॅक्सिमो गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. महामार्गावरील नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात ‘तरूण भारत’ वृत्तपत्राची पार्सल घेऊन जाणारी मॅक्झिमो गाडी दुस-या गाडीला ओलांडत असताना समोरून येणा-या डंपरवर आदळली. यातल्या मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून त्यांची नावं  मधुकर गंगाराम कांबळे,  जगदीश शांताराम पारदुले,  महमिदा शेख,  मॅक्झिमो चालक शेलार अशी आहेत. नीलेश पवार आणि संदीप पावसकर हे अन्य दोघेजण गंभीर जखमी असून कांबळे आणि पावसकर दापोली नगर पंचायतीचे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 9:58 am

Web Title: ratnagiri accident on dapoli khed highway 5 killed in car dumper collision
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे
3 विदर्भातील संत्री बागांवर दुष्काळाचे संकट!
Just Now!
X