News Flash

रत्नागिरी – आंबेनळी घाटात ८०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला

संग्रहित

रत्नागिरीमधील आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळला. घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ट्रक चालक आणि क्लिनरला नियंत्रण सुटत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी ट्रक दरीत कोसळण्याआधीच दोघांनी बाहेर उडी मारली. यामुळे दोघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 11:26 am

Web Title: ratnagiri ambenali ghat truck falls 800 ft down sgy 87
Next Stories
1 नागपुरात शाळेजवळ कोसळली वीज, आठ विद्यार्थी जखमी
2 Maratha reservation : मराठा आरक्षण वैधच!
3 खुल्या गटाच्या चार टक्के जागा वाढणार?
Just Now!
X