26 January 2020

News Flash

VIDEO: रत्नागिरीत नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले आणि…

ही घटना कॅमेऱ्य़ात कैद झाला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

रत्नागिरीतील संगमेश्वर येथे नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळल्याची जीवघेणी घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे ही नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धा सुरु असताना बैलांची जोडी उधळली आणि स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांच्या अंगावर गेली. काहीजण बैलांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, तेदेखील या घटनेत जखमी झाले. ही घटना कॅमेऱ्य़ात कैद झाला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

स्पर्धा सुरु असताना शेपटी पिरगळण्यात आल्याने बैल उधळले असं सांगण्यात येत आहे. बैल इतके चिडले होते की, त्यांनी शेतकऱ्याला फरफटत नेलं. नंतर त्यांनी सुरक्षेसाठी लावलेलं लोखंडी रेलिंगही सोबत ओढत नेलं. बैल अचानक धावत आल्याने उपस्थितांची धावपळ सुरु झाली. बैल अंगावरुन गेल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर प्राणीप्रेमी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ज्याप्रमाणे बैलगाडा स्पर्धेवर बंदी आणण्यात आली त्याप्रमाणे या नांगरणी स्पर्धेवरही बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे.

First Published on August 13, 2019 1:37 pm

Web Title: ratnagiri sangmeshwar bull plowing competition sgy 87
Next Stories
1 उल्हासनगरमध्ये पाच मजली इमारत कोसळली
2 ”लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला”, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंच्या डोळ्यात पाणी
3 पुणे, सातारा, कोल्हापुरात हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा
Just Now!
X