किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा चरणस्पर्श केला. रविवारी पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे पुरेशा प्रमाणात मंदिरात न पोहोचल्याने निराश झालेल्या भाविकांनी आज सोमवारी चरणस्पर्श झाल्याने आनंद व्यक्त केला.
मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील संगमरवरी पायरीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली होती. दुसऱ्या पायरीनंतर सूर्यकिरणे वर सरकत लुप्त झाली. पहिल्या दिवशी चरणस्पर्श न झाल्याने भाविक नाराज झाले होते. त्यात आज पुन्हा ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नाही. सूर्यकिरणे हळूहळू कासव चौक, पितळी उंबरा, संगमरवरी फरशी, मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील पहिली संगमरवरी पायरी, मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील दुसरी संगमरवरी पायरीला किरणांनी श्री महालक्ष्मी चरणस्पर्श केला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.