सतीश गुरव (वय ३८), व्यवसाय मोटार रिवायिडग. महिन्याकाठी उत्पन्न पाच हजारांच्या घरात. घरातली कमावती व्यक्ती आणि खाणारी तोंडे पाच. पोलिसांच्या बेदम मारहाणीत गुरव यांच्या गुडघ्याची वाटी सरकली. ते अंथरूणाला खिळून आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्यास पसे नाहीत. कुटुंबाच्या चरितार्थाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. माळकरी असलेले गुरव पाणावलेल्या डोळ्यांनी केवळ एकच प्रश्न विचारतात, ‘माझा दोष काय’?
दैनंदिन काम करून नेहमीप्रमाणे गुरव घरामध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास भारनियमनाचा कालावधी संपला, म्हणून पाणी भरण्यास ते बाहेर पडले आणि बेछूट मारझोड करीत सुटलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडले. गुरव हे पोलिसांना मारणाऱ्यांपकी आहेत की नाहीत, याची साधी चौकशीही न करता पोलिसांनी िरगण करून गुरव यांना जनावराप्रमाणे काठीने सोलून काढले. माझ्या मुलाला का मारहाण करता, असे विचारत गुरव यांचे वृद्ध वडील हनुमंत गुरव पुढे आले. त्यांनाही पोलिसांचा प्रसाद खावा लागला.
गुरव यांच्याप्रमाणेच गावातील अन्य २५-३० जणांची अवस्था आहे. आठवीत शिकणाऱ्या पूजा संजय धज या चिमुकलीला लाथ मारून तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. सालगडी असलेले संजय धज यांच्या चार पत्र्याच्या शेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी चूल पेटलेली नाही. मुलगी घरात धुसमुसून रडत आहे व पत्नी पोलिसांपुढे पदर पसरून आपल्या नवऱ्याला सोडण्याची विनंती करीत आहे. संजय धज यांच्यावर पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
ही तर रझाकारी – तावडे
जुलमी रझाकाराला लाजवेल, असे कृत्य आर. आर. पाटील यांच्या पोलिसांनी केले आहे. वर्दीच्या मस्तीत सामान्य ग्रामस्थांना तुडवणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांऐवजी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली. ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी तावडे बुधवारी उस्मानाबादेत आले होते. पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडू. त्याखेरीज सभागृह चालू देणार नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना माणुसकी असल्यास कनगऱ्यात येऊन पोलिसांनी केलेले कृत्य पाहावे व जनतेची माफी मागावी. अजूनही अटकेत असलेल्या तिघांना न सोडल्यास आंदोलनाचा इशारा तावडे यांनी दिला.
वृद्ध पठाण यांच्या पत्नीस दरवाजा उघडण्यास वेळ लागला, म्हणून पोलिसांनी दरवाजा तोडला आणि वृद्धेच्या मुस्कटात लगावली. हा वर्दीचा माज आहे. मात्र, असे अन्याय महाराष्ट्र खपवून घेणार नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्या सर्वाच्या पाठीशी महाराष्ट्र ठाम राहील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. आमदार ओम राजेिनबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, भाजपचे संजय िनबाळकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अंनिसकडून निषेध
कनगरा ग्रामस्थांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उस्मानाबाद शाखेने निषेध केला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर अंनिस शाखाध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे, सत्यजित सिरसट, अॅड. देविदास वडगांवकर, शीतल वाघमारे, अॅड. गोपाळ पाकले आदींच्या सह्य़ा आहेत.