News Flash

चौंडेश्वरी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे निर्बंध

इचलकरंजी येथील श्री चौंडेश्वरी सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने शनिवारी र्निबध लादले आहेत. यानुसार बँकेचे समायोजन (क्लिअरिंग) बंद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला.

| August 31, 2014 04:00 am

इचलकरंजी येथील श्री चौंडेश्वरी सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने शनिवारी र्निबध लादले आहेत.  यानुसार बँकेचे समायोजन (क्लिअरिंग) बंद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला. तसेच सोमवारपासून बँकेचे ग्राहक व सभासद केवळ १ हजार रुपयांचे व्यवहार करू शकणार आहेत. बँकेचा वाढता तोटा, कर्जवसुलीतील अपयश यामुळे बँकेची आíथक स्थिती कोलमडली असल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.    
इचलकरंजी येथील देवांग समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन या बँकेची स्थापना २० वर्षांपूर्वी केली होती. अल्पावधीत बँकेने मोठी प्रगती साध्य केली होती. मात्र समाजातील काही बडय़ा कर्जदारांनी मोठय़ा रकमा थकवल्याने बँकेचे आíथक व्यवहार संकुचित बनले. मध्यवर्ती ठिकाणी बँकेची प्रधान कार्यालयाची भव्य इमारत बांधल्यामुळे स्वभांडवल मोठय़ा प्रमाणात खर्ची पडले होते. अशातच बडय़ा ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्याचा सपाटा लावल्याने ठेवीची रक्कमही लक्षणीय प्रमाणात खालावली.
एकेकाळी १०० कोटी ठेवीकडे वाटचाल करणाऱ्या या बँकेच्या खात्यात सध्या अवघ्या २० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कर्ज वितरणाचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात कमी झाले असून ते १० कोटींपर्यंत आलेले आहे. बँकेचा संचित तोटा वाढत चालला असून सध्या बँक १० कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहे. प्रधान शाखेसह बँकेच्या सर्व ९ शाखा तोटय़ात आहेत. यामुळे १४ हजार सभासद असलेली चौंडेश्वरी बँक अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे.
बँकेची खालावलेली स्थिती सुधारण्यासाठी संचालक व व्यवस्थापनाने काही चांगले निर्णय घेतले होते. अलीकडेच ३८ कर्मचार्यानी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर शेवटच्या टप्प्यात नोकरीला लागलेल्या २१ जणांनी राजीनामा दिला. यामुळे पगारावरचा खर्च कमी होऊन नुकसान टळू लागले होते. सध्या ५३ कर्मचारी सेवेत आहेत. सहा महिन्यांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने मुदतपूर्व ठेवी अदा करू नयेत असा आदेश दिला होता. समाशोधनासाठी गेलेल्या धनादेशांच्या रकमेची पुर्तता होत नसल्याने आता रिझव्‍‌र्ह बँकेने चौंडेश्वरी बँकेचे समाशोधन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अवघे १ हजार रुपयांचे व्यवहार सोमवारपासून सभासद व ठेवीदारांना करता येणार आहे. शनिवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिका-यांनी सर्व नऊ शाखाधिकां-यांची बठक घेऊन  शाखानिहाय आíथक व्यवहार, १ लाखावरील ठेवी यांची माहिती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 4:00 am

Web Title: rbi restrictions on choundeshwari bank
टॅग : Kolhapur,Rbi
Next Stories
1 उजनी धरण ८० टक्क्य़ांच्या घरात
2 तीन मंडळांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक
3 शाळेच्या ओढीने चिमुरडीचा २५० मैल प्रवास
Just Now!
X