राज्यातील चार मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात होण्याआधी ‘इव्हीएम’वर टेस्ट वोटिंग केले जाते. हा डेटा लगेच इरेज करायचा असतो. मात्र या चार बूथवर ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली गेली नसल्याने राज्यातील चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. याअंतर्गत अहमदनगर मतदारसंघातील श्रीगोंदा येथील हिरडगावच्या ३०५ क्रमांकाच्या बूथवर फेरमतदान होणार आहे. त्याचबरोबर उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील चांदिवली येथील बूथ क्र. १६० , उत्तर मुंबई मतदासंघातील कांदिवली (प) बूथ क्र. २४३ आणि मालाड (प)मधील बूथ क्र.२४२ वर २७ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येईल.या सर्व ठिकाणी उद्या म्हणजेच २७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत फेरमतदानाती प्रक्रिया पाड पडेल. या चार बूथवर ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली गेली नाही. त्यामुळे या बूथवरील मतांचे गणित चुकले. एका ठिकाणी यादीपेक्षा ५९ जास्त मते आढळली तर अन्य ठिकाणी दोन ते चार मतांचा फरक आढळला. त्यामुळेच या चारही बूथवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.