03 March 2021

News Flash

फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा, उद्योजकांकडून आकारले जाणार एक रूपया उत्पादन शुल्क

जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन

फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायीकांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर १ रुपया इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचे उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले.

द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या १०० टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका ३३० मि.ली बाटलीची किंमत साधारण रू.१५० -१८० आहे. तर ७५० मि.ली ची साधारण टेबल वाईन २५० ते ४०० रुपये या दराने बाजारात मिळते. या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ ७०० ते ८०० पेट्या महारष्ट्रात विकू शकत होते. शिवाय दोन वर्षात या उद्योगात केवळ चार नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंदं इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाईन/मद्यावर प्रति बल्क लिटर १ रुपया इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकरले जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाईन आणि इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 3:22 pm

Web Title: reassurance to the fruit winery business one rupees excise duty charged by the entrepreneurs msr 87
Next Stories
1 ठाणे : पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या करुन आईचीही आत्महत्या
2 Video : कोसळधार! मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी
3 वेळ द्या, मी चर्चेला तयार; मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला पटोलेंचे उत्तर
Just Now!
X