विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

“नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.” असं ट्विट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

“विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव आणि शिस्तबध्दता निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच लष्करी सेवेबाबत आकर्षण निर्माण होण्याच्या दृष्टीने सदरचा अभ्यासक्रम उपयुक्त असून, विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्राथमिक प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे. जय हिंद.” असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.