येत्या आर्थिक वर्षांचे (सन २०१५-१६) महानगरपालिकेचे ५१७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेला सादर करण्यात आले. प्रशासनाने तयार केलेल्या या अंदाजपत्रकात पाणीपट्टीसह अन्य काही सेवा व सुविधांमध्ये दर व करवाढ सुचवण्यात आली आहे. पाणीपट्टीत तब्बल दुप्पट वाढीची शिफारस करण्यात आली असून, काही सेवांवर नव्याने शुल्क आकारणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
मनपाच्या बुधवारी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांना चालू आर्थिक वर्षांचे सुधारित येत्या आर्थिक वर्षांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले. त्यावर सदस्यांना अभ्यासासाठी वेळ देण्यात आला असून, अंदाजपत्रक सादर केल्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली. ती आता शुक्रवारी होणार आहे. त्या सभेत दुरुस्त्यांसह अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात येईल.
प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात पाणीपट्टीत दुप्पट वाढ सुचवण्यात आली आहे. घरगुती वापराच्या अर्धा इंची जोडणीला ३ हजार रुपये (सध्याचा दर १ हजार ५०० रुपये), पाऊण इंची जोडणीला ६ हजार रुपये (सध्याचा दर ३ हजार), एक इंची जोडणीला १० हजार रुपये (सध्याचा दर ६ हजार), व्यावसायिक वापराच्या अर्धा इंची जोडणीला १० हजार रुपये (सध्याचा दर ५ हजार ४००), पाऊण इंची जोडणीला २० हजार रुपये (सध्याचा दर १० हजार ८००), एक इंची जोडणीला ४० हजार रुपये (सध्याचा दर २२ हजार) आणि औद्योगिक वापरातील अर्धा इंची जोडणीला २० हजार रुपये (सध्याचा दर १० हजार ८००), पाऊण इंची जोडणीला ४० हजार रुपये (सध्याचा दर २१ हजार ६००), एक इंची जोडणीला ४३ हजार ८० हजार रुपये (सध्याचा दर ४३ हजार २००) आकारण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे.
मनपा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या मिळून एकूण सुमारे ४८ हजार जोडण्या असून, सध्याच्या दराने त्यापोटी ७ कोटी ६५ लाख रुपये पाणीपट्टी मिळते. प्रशासनाने शिफारस केल्यानुसार यात दरवाढ केल्यास मनपाला सुमारे दुप्पट म्हणजे १५ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळेल. याशिवाय मुख्य जलवाहिनीवरून मीटरने पाणी घेणाऱ्या ग्राहकांच्या दरातही वाढ सुचवण्यात आली आहे. पाणीपुरवठय़ावर होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असून, यावर यापूर्वीच लेखापरीक्षणात त्रुटी काढण्यात आली आहे. या उत्पन्नातील नफा-तोटय़ाचे संतुलन राखण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याची टिप्पणीही करण्यात आली आहे.
कशा कशात दर, करवाढ-
– जन्म-मृत्यू दाखले दुरुस्ती
– अग्निशमन सेवाशुल्क
– नव्याने अग्निशमन कर
– घनकचरा संकलन व वाहतूक सेवा
– पाणीपट्टी
– उद्यानांमधील प्रवेशशुल्क व फुलराणीतील सफर
– अतिक्रमण विभाग
ठळक बाबी
– सावेडीत स्वतंत्र कचरा डेपो व प्रक्रिया प्रकल्प
– याच जागेत आधुनिक कत्तलखाना
– हुडकोच्या अर्थसाहाय्यातून विळद येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प
– जीएसआय प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण
– शहर विकास आराखडय़ातील कामांना चालना
– केंद्राच्या सहकार्याने सार्वजनिक बससेवा

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
tax department of the pcmc collect rs 977 crore 50 lakhs in financial year 2023 24
महापालिका मालामाल…पिंपरी- चिंचवडकरांनी भरला कोट्यवधींचा कर
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये