News Flash

राज्यात 24962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम

ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला आहे

(संग्रहीत छायाचित्र)

ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी म्हणजेच 22 ऑक्टोबरला तब्बल 24962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21580 मेगावॅट तर मुंबईमध्ये 3382 मेगावॅट विजेची मागणी होती.

सध्या ऑक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. 16 ऑक्टोबरला राज्यात 24922 मेगावॅट तर महावितरणकडे 21542 मेगावॅट, 17 ऑक्टोबरला 24687 मेगावॅट तर महावितरणकडे 21223 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानंतर 22 ऑक्टोबरला ही मागणी 24962 मेगावॅटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 21580 मेगावॅट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून 20630 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंक कमी आहे अशा जी-1 ते जी-3 गटातील वाहिन्यांवर 950 मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले.

राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24012 मेगावॉट वीज पारेषीत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 1:28 pm

Web Title: record break electricity demand
Next Stories
1 राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा
2 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार
3 सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल – शरद पवार
Just Now!
X