महाबळेश्वरसह परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून, या वर्षीच्या हंगामात ३०० इंच पाऊस झाला आहे. याबाबत ‘द वेदर चॅनेल इंडिया’नेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये मेघालयातील मॉसिनराम, चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. या वर्षी येथे आज पर्यंत ७६३१ मि. मि पाउस झाला आहे.

जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणुन मॉसिनराम, चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर पहिल्या क्रमांकावर आले आहे. हवामान खात्याने नुकतीच या बाबतची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार यंदा मॉसिनराम शहरात आजपर्यंत साडेसहा हजार मिमी पावसाचा टप्पा पार केला आहे. तर महाबळेश्वर शहरात साडेसात हजार मिमी पाऊस झाला आहे. तब्बल तेरा वर्षांनतर १ जुन ते ८ सप्टेंबर अखेर येथे ३०० इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे २३७ इंच पावसाची नोंद येथे झाली होती.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

कोकण , पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळं वेगळं गिरीस्थान आहे कि या ठिकाणी नेहमी सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. महाबळेश्वर येथे सदाहरीत घनदाट जंगल उंच डोंगररांगा अशी भौगोलिक स्थिती असुन, येथे पावसाळयात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते. अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठया संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात. यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाउस पडणारे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर शहराची नोंद झाली आहे.

सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजी ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होत आहे. ‘द वेदर चॅनेल इंडिया’नेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये महाबळेश्वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्यानुसार महाबळेश्‍वरमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याचे नमूद केले आहे. महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी पातळी वाढते तर चिपळूण, महाडसह कोकणातील काही भागावर या पावसाच्या पाण्याचा परिणाम होतो.