सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची चौकशी करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली असता मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले.
त्यामुळे भरतीतील रॅकेटची तारांबळ उडाली आहे. आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार झाला आहे. आर्थिक देवघेवीमुळे भरतीत वशिलेबाजी झाली. भारती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना भरतीत घेण्यात आलेल्या प्रश्नांची नीटशी उत्तरेही देता येत नाहीत. अशा पाश्र्वभूमीवर थेट मुख्यमंत्र्यांची नागपूर येथे आम. वैभव नाईक यांनी भेट घेऊन चौकशीची मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सत्ता काँग्रेसची आहे. काही काँग्रेसजनांनीदेखील भरतीतील गैरव्यवहार मांडला होता. या पाश्र्वभूमीवर आम. नाईक यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यानी सकारात्मक भूमिका दर्शवत भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले.
या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भरतीच्या चौकशीमुळे आर्थिक देवघेव करणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.