04 July 2020

News Flash

पावसाळ्यात स्वस्त मिरची मसाल्याची जेवणात चव

करोना काळात झाडावर राहिलेला मिरचीचा तोडा स्थानिकांच्या दारी

(संग्रहित छायाचित्र)

करोना काळात झाडावर राहिलेला मिरचीचा तोडा स्थानिकांच्या दारी

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पावसाळ्यातही स्वयंपाकातील वैविध्य टिकविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या गृहिणींना घरगुती मसाले हाताशी असावे लागतात. अर्थात याची तयारी उन्हाळ्याच्या आरंभीस वा मध्यावधीस सुरू होते. यंदा करोनामुळे ही संधी हुकली. परंतु, या संकटाकाळातही पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील स्थानिकांनी स्वस्तातली मिर्ची मिळवून मसाल्याची वर्षभराची बेगमी केली आहे. ‘करोना विषाणू’चे संक्रमण रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर मिरचीचा झाडावरचा तोडा उत्पादक शेतकऱ्यांना करता आला नाही. त्यामुळे मिरची झाडावरच सुकली. परिणामी शेतकऱ्यांनी स्थानिकांना ही मिरची घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे या पावसाळ्यात घरगुती ‘मिर्चमसाला’ जेवणात चव आणणार आहे.

घरगुती मसाला बनवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र पद्धत असते व आपल्या आवडीनिवडीप्रमाणे काश्मिरी मिरची, पटना मिरची व संकेश्व्री मिरची प्रमाण ठरवून त्यामध्ये धने, जिरे राई, तमालपत्र, दगडफूल, नागकेशर, बादाम, काळीमिरी, शहाजिरे, हिंग, तीळ, वेलची इत्यादी वस्तू एकत्रितपणे करून दळल्या जातात. यंदाच्या वर्षी जिल्ह्य़ात स्थानिक पातळीवर पिकवला जाणाऱ्या तिखट जातीच्या मिरचीला बाजारपेठ उपलब्ध असल्याने ही मिरची झाडावर सुकल्याचे प्रकार घडला.

अनेक शेतकऱ्याने परिसरातील बांधवांना झाडावर पिकलेली मिरची विनामूल्य वेचून घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे  यंदा आदिवासी भागांतील रहिवाशांनी मिरचीच्या दळणासाठी चक्क्य़ांवर रांगा लावल्या आहेत. यात दळणाचा खर्च विकत घेतला जाणाऱ्या मसाल्याच्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी असल्याने जिल्ह्य़ात पिकवलेल्या मिरचीला दळून मसाला तयार करणाऱ्यांनी रांगा लावल्या आहेत.

करोना संक्रमणामुळे राज्यातील टाळेबंदीचा परिणाम घरगुती मसाला तयार करण्यावर झाला. महिन्याभरापासून मसाला दळणाऱ्या चक्की आणि गिरणींसमोर पहाटेपासून मोठय़ा रांगा लागत आहेत. उष्णतेच्या या वातावरणात नागरिकांना मसाला तयार करून घेण्यास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या मध्यापासून मसाला साहित्य बाजारात उपलब्ध होत असते. वेगवेगळ्या प्रकारची मिरची व इतर साहित्य सुकवून गिरणीमध्ये दळण्यासाठी देण्यात येते. यंदा मार्च महिन्याच्या मध्यापासून करोना सं क्रमणामुळे दुकाने अत्यावश्यक वस्तूंच्या वि क्रीसाठी खुली राहत असत. मात्र अशावेळी खरेदी करणारम्य़ा नागरिकांना अनेकदा पोलिसांकडून रोखले जात असल्याने नागरिकांनी पहिल्या दोन टाळेबंदीच्या सत्रामध्ये मसाल्याचे साहित्य खरेदी करण्याचे टाळले.

मजूर मूळ गावी

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात मसाल्याच्या गिरणीत गर्दीने फुलून निघाल्या आहेत. यंदाच्या वर्षी अनेक मसाला गिरणीमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर मूळ गावी परतल्याने काही गिरण्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी मसाला दळून घेण्यासाठी पहाटे दोन ते तीन वाजल्यापासून दूरवरून आलेले लोक गिरण्यांच्या बाहेर रांगा लावत असल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात दिसत आहे. ग्रामीण भागात अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दळण वेळेवर करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना मसाला दळणासाठी चार ते सहा तास प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 4:12 am

Web Title: red chilli powder rate fall in palghar ahead of rainy season zws 70
Next Stories
1 ८० आया, कक्ष परिचरांना कामावर न येण्याचे आदेश
2 करोनाग्रस्त मृत व्यक्तीच्या पत्नीचा ७० किलोमीटर पायी प्रवास
3 रत्नागिरी शहरातील ५ परिचारिका करोनामुक्त
Just Now!
X