ज्या फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना जाहीर करण्यात  आली आहे . त्यासाठी ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचा शासन आदेश बुधवारी नियोजन विभागाने जारी केला आहे . ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळात कोकणातील फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे कोकणातील बागायतदार पूर्णपणे उध्व स्तक झाला आहे. या फळबागांबरोबरच बागायतदारांचेही पुनरूज्जीवन गरजेचे आहे .  त्यासाठी जुनी फळबाग लागवड योजना सुरू करावी. अशी मागणी शेतकऱ्यांची होती . म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे . आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी, चिकू या पिकांना याचा लाभ होणार आहे. रोजगार हमीचा लाभ घेणारे आणि न घेणारे असे दोन्ही शेतकरी यासाठी पात्र असतील . कोकणातील रायगड, रत्नागरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्य़ातील बागायतदारांना याचा लाभ मिळणार आहे .

असे निकष असतील ..

या योजनेच्याक लाभासंबंधी शासनाने काही निकष देखील ठरवून दिले आहेत . फळबाग लागवडीची लाभार्थी शेतकऱ्याच्याा सातबारा उताऱ्यावर नोंद घेतल्याा शिवाय अनुदान देता येणार नाही . लाभार्थ्यांने जर रोपे किंवा कलमे सरकारी किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून घेतली तर रोपांची रक्केम थेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याय संस्थेच्या  बँक खात्यात जमा करावी . अन्य, बाबींचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्याात जमा होईल . जे लाभार्थी शेतकरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी ९० टक्के आणि कोरडवाहू फळबागांसाठी ८० टक्के रोपे जगवतील.  त्यांनाच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या योजनेचा लाभ मिळेल. अस्तित्वात असलेल्या बागांमधील काही झाडे नष्ट झाली असल्यास नष्ट  झालेल्या झाडांच्या संख्ये्इतकीच झाडे पुनर्लागवडीसाठी पात्र राहतील .

शासनाने ही योजना आता लागू केली असली तरी या मोसमात तिची अंमलबजावणी करणे अवघड जाणार आहे. कारण ज्या प्रमाणात बागांचे नुकसान झाले आहे त्या तुलनेत रोपे उपलब्धम नाहीत ही त्या तील प्रमुख उडचण आहे. त्या मुळे योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पुढील हंगामापर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.