18 September 2020

News Flash

‘पॅकेज’मधील गळती रोखणार : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे. जुन्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी दिलेले ‘पॅकेज’ नेत्यांनी खाल्ले, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.

| April 12, 2015 05:37 am

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे. जुन्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी दिलेले ‘पॅकेज’ नेत्यांनी खाल्ले, पण आम्ही तसे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलेला प्रत्येक पैसा त्यांच्याच हाती पोचेल, याची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
कृषी प्रतिष्ठानच्या वतीने येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनातील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी सरकारने केलेल्या चुकांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
ते म्हणाले, ह्लआठ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान विदर्भात आले होते. त्यांनी ‘पॅकेज’ दिले. त्यामुळे आत्महत्या कमी होतील असे वाटले होते, पण ‘पॅकेज’चा परिणाम दिसला नाही. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. या समस्येचे मूळ कशात आहे याचा विचारच त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केला नाही. पण, आता आम्ही तसे होऊ देणार नाही. जोपर्यंत या भागातील शेतीला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. सरकारने सिंचनसाठी ३५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रवाही सिंचनालाही मर्यादा आहेत, त्यामुळेच आम्ही महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. त्यातून राज्यात विकेंद्रित जलसाठे निर्माण होतील आणि या माध्यमातून आम्ही संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करणार आहोत.ह्व
‘पॅकेज’अंतर्गत ७ हजार सिंचन विहिरी तयार करायच्या होत्या, गेल्या सरकारच्या काळात निम्म्या देखील तयार झाल्या नाहीत. पण, आता सरकारने २२ हजार विहिरी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. कृषी पंपांना वीज जोडण्या मिळण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून, मागेल त्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यास सांगण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कापूस प्रक्रिया क्षेत्रात विकास न झाल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. कापूस उत्पादक भागात मूल्य साखळी निर्माण करून शेतकऱ्यांचे स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न सरकार करणार असून, राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागी ‘मॉल’ उभारण्याची परवानगी देण्याआधी या गिरण्या विदर्भ-मराठवाडय़ात सुरू करण्याची अट घालण्यात आली आहे. लवकरच वस्त्रोद्योग मंडळाच्या चार गिरण्या या भागात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विदर्भात अधिकारी सेवा देण्यास तयार होत नाहीत, त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठी आहे. आता अधिकाऱ्यांना पहिली नियुक्ती विदर्भात करण्याची आणि पदोन्नतीवर विदर्भातच पाठवण्याची अट घालण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रदर्शनाचे संयोजक सोमेश्वर पुसतकर यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:37 am

Web Title: relief packages to farmers cm fadnavis
Next Stories
1 फ्रान्सच्या मदतीने नागपूर ‘स्मार्ट सिटी’होणार
2 नक्षलवाद्यांच्या दहशतीचे ग्रामपंचायत निवडणुकीवर सावट
3 जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Just Now!
X