राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून, इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या कुटुंबियांची दमछाक होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुद्दा गाजत असतानाच रोहित पवारांनी वाटप केलेल्या रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. रोहित पवारांनी वाटप केलेल्या रेमडेसिवीरवरून भाजपाने प्रश्न उपस्थित केला असून, निलेश राणे यांनी याप्रकरणी सरकारकडे रोहित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होताना दिसत आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रवादी वेल्फफेअर फंडातून रोहित पवार यांनी इंजेक्शन प्रशासनाकडे सुपूर्त केले. यावर निलेश राणे यांनी शंका उपस्थित केली. “सामान्य जनतेला रेमडेसिवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. मात्र, रोहित पवारांना वाटप करण्याइतपत रेमडेसिवीर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडेसिवीर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहित पवारांनी खुलासा करावा नाही, तर तत्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

“आदरणीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब व गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर, पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केले,” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली होती.

आणखी वाचा- महाराष्ट्रात कधीपासून लॉकडाउन?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

काळाबाजार रोखण्यासाठी महत्त्वाचा आदेश

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने इंजेक्शनच्या विक्रीबाबत निर्देश जाहीर के ले आहेत. ठोक विक्रे त्यांनी के वळ करोना घोषित रुग्णालयांना व अशा रुग्णालयातील किरकोळ औषध विक्रे त्यांनाच इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रे त्यांविरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.