News Flash

चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री परवाना नूतनीकरणाला उद्यापासून सुरुवात

चंद्रपूर, वरोरा व राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार ; उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली प्रक्रिया

Renewal of liquor license
नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे.(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. राज्य शासनेने अधिसूचना जारी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल करण्यात आले. आता उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले आहे. उद्या (बुधवार) पासून चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासोबतच नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे.

चंद्रपूर दारूबंदी उठवली : देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत, सचिन सावंतांनी भाजपावर साधला निशाणा!

सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बंदीच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या दारूची अवैध विक्री जिल्ह्यात करण्यात आली. मोठ्यासंख्येने नवीन गुन्हेगार तयार झाले. यातून जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची चर्चा जोर धरू लागली. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली जाईल असे उघडपणे वक्तव केले.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

दारूबंदी उठविण्याचा खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा अनुमती दर्शविली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व झा समितीनेसुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीच्या अहवालानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ८ जुन २०२१ रोजी गृह विभागाने अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचे आदेश दिले. आता उत्पादन शुल्क विभागाने ही प्रक्रिया सुरु केली असल्याचे अधीक्षक सागर ढोमकर यांनी सांगितले.

चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? : डॉ.अभय बंग

तर, चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी ‘असफल’ झाली असे निमित्त देऊन दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा अयोग्य व दुर्दैवी निर्णय आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक, दारूबंदी आंदोलनाचे समर्थक तथा युती सरकारच्या काळात गठीत दारूबंदी समितीचे सदस्य डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 9:43 pm

Web Title: renewal of liquor license in chandrapur district starts from today msr 87
Next Stories
1 Corona Update : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, दिवसभरात ३८८ मृत्यूंची नोंद!
2 “विभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा”
3 ‘आषाढी’साठी नियमावली जाहीर ; देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी!