News Flash

सर्वोच्च न्यायालयात संरक्षणाबाबत माहिती सादर करण्यासाठी पुणे पोलिसांचा अहवाल

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्लीला पाठवली आहे. पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी

| March 14, 2013 05:25 am

पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नाही!
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्लीला पाठवली आहे. पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी ही माहिती मागवली असल्याचे आता स्पष्ट झाले       आहे.
पवार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ाची माहिती तत्काळ देण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याबाबत बुधवारी पुणे पोलिसांनी निवेदनात प्म्हटले आहे की, संरक्षित व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणासंदर्भाची माहिती सर्वोच्च न्यायालयास सादर करायची असल्याने दिल्ली पोलिसांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्य़ांची माहिती मागितली होती.  त्यानुसार पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.  याबाबत मंगळवारी रात्री पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी संपर्क साधून पवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती पाठविण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी, अशी कोणतीही माहिती गोळा केली जात नसल्याचे   स्पष्ट केले होते.   मात्र, याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर बुधवारी पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली पोलिसांना ही माहिती मागविण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:25 am

Web Title: report by pune police to present the information about security
टॅग : Security,Supreme Court
Next Stories
1 लाचखोरांना कंटाळून अधिकाऱ्याने लावले कार्यालयाबाहेर संपत्तीचे विवरण
2 यशवंतरावांचे ‘कृष्णाकाठ’ आता श्राव्य माध्यमात
3 शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्याची घोषणा
Just Now!
X