News Flash

अर्णब गोस्वामी यांची क्वारंटाइन सेलमध्ये रवानगी

कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारी रात्री दिले. यानंतर तिनही आरोपींची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेल मध्ये करण्यात आली आहे. ४० अन्य कैद्यासमवेत तिघांना ठेवण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगर पालिकेच्या शाळा इमारतीत क्वारंटाईन सेल स्थापन केला आहे. या क्वारंटाईन सेलमध्ये कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर याच क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन होत नाही तोवर याच क्वारंटाईन सेल मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. तिघांनाही क्वारंटाईन सेलच्या एक नंबर रुममध्ये ठेवण्यात आले आहे. इतर कैद्यांसमवेत त्यांना कारागृहात शिजवलेले अन्न, पाणी घ्यावे लागणार आहे. या क्वारंटाईन सेल परीसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिनही आरोपींनी मुख्य न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्याजामिन अर्जांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:49 pm

Web Title: republic tv arnab goswami arrested in anvay naik suicide case shifted to quarantine centre sgy 87
Next Stories
1 अन्वय नाईकांची आत्महत्या न पटणारी; सत्य लवकरच बाहेर पडेल : निलेश राणे
2 मंदिरं उघडण्यासाठीची मार्गदर्शकतत्वे तयार!
3 “तळी उचलणाऱ्या एका संपादकाला…” अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरुन राजू शेट्टी संतापले
Just Now!
X