29 September 2020

News Flash

‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’

मुख्यमंत्र्यांनी एक नाव सुचवण्याची सूचना दिली होती त्यानंतर मी महातेकर यांचे नाव सुचवल्याचे आठवले यांनी म्हटले आहे

महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

रविवारी होणाऱ्या राज्य सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती ना रामदास आठवले दिली आहे.उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयराज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 1:11 pm

Web Title: republican party of india leader avinash mahatekar to take oath as a minister in maharashtra governments cabinet expansion says ramdas athawale scj 81
Next Stories
1 तुझ्यात जीव रंगलामधील ‘या’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल
2 … तर एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना
3 मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे भेट
Just Now!
X