बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे अभयारण्य वन विभागाच्या अखत्यारीत आहे. ९ जून रोजी लोणार सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमूने घेण्यात येऊन, ते संशोधनासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज शुक्रवारी यवतमाळ येथे आयेजित बैठकीत दिली.

लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले जगातील वैशिष्टपूर्ण सरोवर आहे. यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे लाल रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी व हॅलो बॅक्टेरीया या जीवाणुंमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल होत असल्याचे मत व्यक्त केले. इराणमधील क्षारयुक्त सरोवरामध्ये अश्याप्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात येत असून, अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली.

ग्रामविकासाची कहाणी
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अकोला येथील वन्यजीव विभागाने लोणार सरोवराच्या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमूने घेण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयचे डॉ.मिलींद शिरभाते यांना लोणार येथे पाठविले होते. त्यांनी गुलाबी रंगाच्या पाण्याचे व मातीचे नमूने गोळा करून वनविभागाकडे सादर केले आहे. पाण्यातील रंगबदल तपासासाठी सदर नमूने खास दूतामार्फत नागपूर येथील ‘नीरी’ संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठवले आहे.

बुलडाणा शहराच्या दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला ९० किमी अंतरावर लोणार गावालगत उल्कापातामुळे तयार झालेले हे एकमेव सरोवर आहे. हे सरोवर लोणार अभयारण्यांतर्गत येते. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील ‘हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराईट इम्पॅक्ट’ने तयार झालेले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४६४.६३ मीटर असून खोली १५० मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास एक हजार ७८७  मीटर तर उत्तर-दक्षिण व्यास एक हजार ८७५ मीटर आहे.