राज्य निवडणूक आयोगाने नागपूर, धुळे, वाशिम, अकोला, नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.  तर ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले असून, त्यात अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.

पाच जिल्हा परिषदांसाठी सात जानेवारीला मतदान

नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूरसह अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या येत्या ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारीला मतमोजणी होईल.

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा

  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
  •  अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद
  •  अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
  • अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
  •  नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती</li>
  •  नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
  •  खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
  • खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर