मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, उद्या (रविवार) या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपाच्यावतीनं निदर्शनं देखील करण्याता येणार आहेत. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे! – भाजपा

गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होतं, परमवीर सिंग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याचा विडाच उचलला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे. तसेच, राज्यातील MVA म्हणजे महाविकासआघाडी नाही तर MVA म्हणजे महावसुली आघाडी. #ParambirSingh असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने पत्रकारपरिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“महाराष्ट्र गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत? आमची ही देखील मागणी आहे, हे जे वसुली रॅकेट आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी महाराष्ट्र सरकार चालवत आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काय जबाबदारी आहे? ते आतापर्यंत काही बोलले का नाही? हे भ्रष्टाचारी सरकारला एक मिनिट देखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्याप्रकारचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, हे म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही. एक-एक मिनिटं हे सरकार सत्तेवर राहणं लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. हे सरकार आज महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी एक धोका बनलं आहे, हे धोकादायक सरकार आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे.