राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आता ट्विटर वार सुरू झाल्याचं दिसत आहे. कारण, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर व लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिताना, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर धनंजय मुंडेंनी ट्विट करत प्रत्युत्तर देखील दिलं. मात्र आता धनंजय मुंडेंनी केलेल्या या ट्विटवर पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं असून, ट्विट करत निशाणा देखील साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या भल्यासाठी CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.

“बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये, आम्ही…”; पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंवर निशाणा

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हीत माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असं पंकजा मुंडेंनी पत्रात म्हटलं होतं. त्यांच्या या पत्रावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विट करत त्यांना उत्तर दिलं आहे.

“ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून करोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असं धनंजय मुंडे ट्विटद्वारे म्हणालेले आहेत.

“ताईसाहेब…”, पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

तसेच, “बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो,” अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Respect the opportunity they give you pankaja mundes reply to dhananjay munde msr
First published on: 16-04-2021 at 15:53 IST