19 September 2020

News Flash

‘शिवसेनेने माघार घ्यावी, भाजपनेही आग्रह सोडावा’

भारतीय जनता पक्षाला जागा वाढवून पाहिजे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला. तो सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ७-८ जागा भाजपला देऊन ताण

| September 20, 2014 01:10 am

भारतीय जनता पक्षाला जागा वाढवून पाहिजे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला. तो सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ७-८ जागा भाजपला देऊन ताण कमी करण्याची विनंती करणार आहोत, असे रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे सांगितले. शिवसेनेने माघार घ्यावी व भाजपनेही आग्रह सोडावा, या वरही भेटीत लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले.
येथील रिपाइं नेते बाबुराव कदम यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या सांत्वनासाठी आठवले येथे आले होते. महायुती तुटणार नाही. आघाडीचे नेते जागावाटपासाठी वाद घालतात, तसाच हा वाद आहे. त्यांच्याच मुशीत आम्ही तयार झालो आहोत. त्यामुळे एवढे दिवस आम्ही ताणले होते. आता आम्ही जागावाटपात दोन आकडय़ांवरून एकआकडी संख्येत मागे आलो आहोत. या तणावाला कोणी एकटा जबाबदार नाही. पण असाच वाद होत राहिल्यास सत्ता मिळणार नाही. आताच केवळ नाही, तर पुढची २५-३० वष्रे सत्तेशिवाय काढावी लागतील. त्यामुळे युती होणे कधीही चांगले, असेही आठवले म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीची घोषणा दिली होती. सत्तेच्या रूपाने ती पुढे न्यायची असेल वाद थांबवायला हवेत, असेही आठवले म्हणाले. सेनेला जुनेच सूत्र हवे आणि भाजपचा वाढीव जागांचा आग्रह, यामुळे घोडे असल्याची माहितीही आठवले यांनी दिली. वेगळे लढलो तर सत्ता येणार नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:10 am

Web Title: retreat shivsena sold persistence bjp
टॅग Aurangabad,Bjp
Next Stories
1 समता कॉलनीत पती-पत्नीचा निर्घृण खून
2 चौंडीतूनच भाजपची सत्तापरिवर्तन यात्रा- अमित शहा
3 आघाडी सरकारचा एकही मंत्री तुरुंगापासून वाचू शकणार नाही
Just Now!
X