News Flash

राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. देशमुखांसह चौघांना अटकपूर्व जामीन

महसूल भवनाचा गरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर या चौघांनीही उच्च

| June 24, 2015 07:59 am

महसूल भवनाचा गरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवला आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हे दाखल होण्याच्या या घटनेने राज्यभर खळबळ निर्माण झाली आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावणे दोन कोटी रुपये खर्च करून महसूल कर्मचारी कल्याण समितीने उभारलेली दोन मजली सर्व अद्ययावत अशी आलिशान शासकीय इमारतीतील दोन गाळे महसूल कर्मचारी संघटनेने भाडय़ाने देऊन शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुखांसह नंदू बुटे, गजानन टाके इत्यादींविरुद्ध फसणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले होते. महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारीपदाचा गरवापर करून संघटनेने महसूल भवनातील काही गाळे बेकायदेशीरपणे झेरॉक्स सेंटर व एका चहा कँटिनवाल्याला भाडय़ाने दिल्याचे चौकशीत उघड झाले. तहसीलदार अनुप खाडे यांच्या तक्रारीवरून यवतमाळ पोलिसांनी महसूल कर्मचारी कल्याण समितीचे पदाधिकारी व डॉ.रवींद्र देशमुख यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते आणि ती टाळण्यासाठी या चौघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळवण्याठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून चारही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांचे नेते असलेल्या डॉ. रवींद्र देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिल्हाधिकारी करू शकतात आणि कुणाचेही कोणतेही बेकायदा कृत्य खपवून घेत नाहीत, ही जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची भूमिका अनेकांच्या छातीचे ढोके वाढवत असल्याचे सर्वच विभागातील चित्र आहे.

‘महसूल भवना’चा ताबा सरकारकडे
दरम्यान, ‘राज्य महसूल कर्मचारी कल्याण निधी’चे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधलेल्या आलिशान ‘महसूल भवना’चीही चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी अतिरिक्त जिल्हाधिकारी एल.बी.राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, या आलेशान महसूल भवनात इतरत्र असलेल्या दोन शासकीय कार्यालयांना हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण निधी समितीच्या गरव्यवहाराची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याच्या घटनेने महसूल कर्मचारी संघटनेला चांगलाच हादरा बसला आहे. उल्लेखनीय म्हणजे, या महसूल भवनात महसूल कर्मचारी संघटनेचे शानदार विश्रामगृह आहे. शिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी आता महसूल भवनाचा ताबा स्वतकडे घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2015 7:59 am

Web Title: revenue department corruption
Next Stories
1 प. विदर्भातील ९१६ गावांना पुराचा धोका
2 सांगलीत दारूअड्डे उद्ध्वस्त
3 मोभारकर यांना अज्ञात व्यक्तींकडून मारहाण
Just Now!
X