News Flash

प्राध्यापकांना ७२६ कोटींचा हप्ता देण्याचे आदेश

राज्यातील ११ विद्यापीठांतील जवळपास ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना देय असलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे ७२६ कोटी रुपये वित्त

| November 22, 2013 02:16 am

राज्यातील ११ विद्यापीठांतील जवळपास ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना देय असलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे ७२६ कोटी रुपये  वित्त विभागाने उच्च तंत्रशिक्षण विभागला अदा केले असून, येत्या चार दिवसांत प्राध्यापकांच्या खात्यात ही रक्कम संबंधित विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालकांनी जमा करायची आहे.
राज्य सरकारने थकीत बाकी रक्कम द्यावी म्हणून एम.फुक्टो.ने तीन महिने परीक्षा बहिष्कार आंदोलन केले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मिटला, पण त्याच वेळी प्राध्यापकांची थकबाकी ३१ जुल २०१३ च्या आत अदा करण्याचे अभिवचन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले होते. त्याप्रमाणे ९०० कोटी रुपये सरकारने अदा केले, पण ७२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊनही ही रक्कम अदा करण्यास कालापव्यय करीत राहिले. संघटनेने  न्यायालय अवमान याचिका दाखल केल्यानंतर ही रक्कम अदा करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
अमरावती विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. एस.व्ही रणदिवे यांनी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा या त्यांच्या अखत्यारातील पाचही जिल्ह्य़ांतील १४५ अनुदानित खाजगी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून थकबाकीच्या रकमेचा दुसरा आणि शेवटचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आला असून, प्राध्यापकांना देय असलेली रक्कम त्वरित अदा करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती विभागात जवळपास २ हजार प्राध्यापकांना २८ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, पुणे, गडचिरोली, नागपूर इत्यादी अकरा विद्यापीठातील जवळपास दीड हजार खाजगी अनुदानित महाविद्यालयातील ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना ७२६ कोटी रुपये मिळणार आहेत.

अखेर सरकार राजी झाले
उल्लेखनीय म्हणजे, आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टी यामुळे कोटय़वधींचे पॅकेज देण्यात आल्याने सरकारची तिजोरी रिकामी होण्याच्या वाटेवर असल्याने प्राध्यापकांना देय असलेली ७२६ कोटी रुपयांची थकबाकी अदा करणे सरकारला शक्य होणार नसल्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि उच्च न्यायालयात दिलेले अभिवचन लक्षात घेऊन वित्त विभागाने आता एम.फुक्टो.च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील ११ विद्यापीठातील ३५ हजार प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:16 am

Web Title: revenue department order to give installment of 726 million to the professor
Next Stories
1 रत्नागिरी जिल्ह्य़ातील विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्याचे प्रयत्न -पालकमंत्री उदय सामंत
2 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची जागतिक मच्छीमारीदिनी मच्छीमारांची मागणी
3 ढाकणे यांचे आजपासून ‘वर्षा’ समोर धरणे
Just Now!
X