पोलीस दल दुसऱ्या स्थानी कायम

हर्षद कशाळकर,अलिबाग

लाचखोरीच्या प्रकरणात राज्यात महसुल विभाग अव्वल स्थानी असून पोलीस विभाग दुसऱ्या R मांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. सात महिन्यात राज्यभरात लाचखोरीची ४९८ प्रकरणे समोर आली असून ६६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचा तर १५२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेष आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लाचखोरीच्या प्रकरणात सापडणाऱ्यांमध्ये वर्ग ३ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्यात जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ मध्ये एकूण १ हाजर २८७ लाचखोरीची प्रकरणे समोर आली. यात महसुल विभागाच्या ३२७, पोलीस विभागाच्या २९४, अभियंता संवर्गातील ५०, शिक्षक संवर्गातील ३०, वैद्यकीय अधिकारी १५, वकील ५, लोकप्रतिनिधी २० आणि इतर विभागातील ५४६ प्रकरणांचा समावेष होता.  लाचखोरीच्या प्रकरणात वर्ग तीन मध्ये मोडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. वर्ग १ मधील २९, वर्ग २ मधील ५४, वर्ग ३ मधील ४०३ तर वर्ग ४ मधील २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाली. विशेष बाब म्हणजे खाजगी व्यक्तीमार्फत लाच स्विकारण्याचा कलही अधिकाऱ्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात तब्बल १०५ खाजगी व्यक्तींना लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली.

राज्यात लाचखोरी विरोधात तRार नोंदवणाऱ्या तरुणांचा सहभाग वाढत असल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. लाचखोरी विरोधात तRार नोंदवणाऱ्यांमध्ये २६ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल ३६ ते ४५ वयोगटातील व्यक्तीनी लाचखोरीला वाचा वाचा फोडली आहे.

दोन वर्षांतील लाचखोरीच्या प्रकरणांचा आढावा घेतला तर जिल्हा परिषद, महानगर पालिका, महावितरण, वनविभाग, पंचायत समिती विभागां विरोधातील लाचखोरीच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. तर पोलीस आणि महसुल विभाग लाचखोरीत अव्वल स्थानी कायम आहेत.

दरम्यान २०१८ महिन्याच्या अखेर पर्यंत लाचखोरीची ९३६ प्रकरणे समोर आली होती. ९८१ आरोपींना अटक करण्यात आली. यात महसुल विभागातील २१८ तर पोलीस विभागातील १९४ प्रकरणांचा समावेष आहे. यामध्ये महसुल विभागातील २७४ जणांना तर पोलीस विभागातील २५९ अटक करण्यात आली आहे. अभियोग पुर्व मंजूरीसाठी २९९ प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहे. यात ९० दिवसा पेक्षा जास्त काळ प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची संख्या १६८ आहे.

एकुणच शासकीय कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी व्यापक कारवाई होत असली तरी लाचखोरीचे प्रमाण कमी होत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

  जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ मध्ये केलेली कारवाई  

लाचखोरीच्या प्रकरणात सर्वाधिक सापळे पुणे विभागात लावण्यात आले. इथे ११२ जणांवर कारवाई झाली, त्याखालोखाल औरंगाबाद विभागात ७२, नाशिक विभागात ६५, नागपुर विभागात ६०, ठाणे विभागात ५८,  अमरावती विभागात ६९, नांदेड विभागत ५२ तर मुंबईत सर्वात कमी २४ जणांवर सापळे लावून कारवाई करण्यात आली.