18 January 2021

News Flash

“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बोचरी टीका

आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरुन त्यांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली. मात्र याबाबत बोलत असतानाच त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली. आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आजच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तसंच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे असा विश्वासही व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मोदी सरकारवरही टीका

सध्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे हे अन्यायकारक आहेत. हे कायदे भांडवलदारांचा फायदा करुन देणारे आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्राचा संदर्भ दिला जातो आहे. तो संदर्भ देणाऱ्यांनी ते पत्र जरुर नीट वाचावं त्यावेळी शरद पवार यांनी ते पत्र शेतमालास योग्य किंमत मिळावी आणि जनतेला ती उत्पादनं स्वस्त मिळावीत या अनुषंगाने ते पत्र लिहिलं होतं. आधी त्या पत्राचा नीट अभ्यास करावा, भांडवलदारांचा फायदा व्हावा यासाठी ते पत्र नव्हतं. आताच्या सरकारने लादलेले कायदे हे भांडवलदारांचा फायदा करुन देणारे आहेत असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 7:04 pm

Web Title: revenue minister balasaheb thorat slams devendra fadanvis on his statement scj 81
Next Stories
1 दल बदलू कार्यक्रम सुरूच; जुन्या भूमिकेची आठवण करून देत शेलारांनी शिवसेनेवर डागला ‘बाण’
2 राज्यात ‘वॉटर स्पोर्ट्स’ पुन्हा सुरू करण्याबाबत दिलासादायक निर्णय
3 राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले – बाळासाहेब थोरात
Just Now!
X