26 November 2020

News Flash

धक्कादायक ! कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिला पोलिसाला नेलं फरफटत

महिला पोलीस रिक्षाचालकाकडे वाहतूक परवाना मागत असताना ही घटना घडली

कल्याणमध्ये एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस रिक्षाचालकाकडे वाहतूक परवाना मागत असताना ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नागेश अलवागिरी असं या मुजोर रिक्षाचालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आशा गावंडे असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आशा गावंडे वाहतूक नियंत्रण करत होत्या. यावेळी रिक्षाचालक नागेश हा विना गणवेश रिक्षा चालवत होता. आशा गावंडे यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी नागेशकडे वाहतूक परवाना मागितला. मात्र यावेळी नागेशने अरेरावी करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

आशा गावंडे यांनी रिक्षा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागेशने तरीही रिक्षा न थांबवता त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर आजुबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी चालक नागेशला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 6:21 pm

Web Title: rickshaw driver pulls woman constable in kalyan
Next Stories
1 नाटय़गृहाचे ग्रहण सुटेना!
2 अपघातानंतरही रेल्वेप्रवाशांचा प्रवास खडतर!
3 ‘गुणिजन’ निवडीत महापौर एकाकी?
Just Now!
X