राष्ट्रीय समितीचा आरोग्य मंत्रालयाला अहवाल

पुणे : करोना प्रतिबंधक लसीकरणानंतर रक्तस्त्राव किं वा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण अत्यल्प आहे. लसीकरणानंतरच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय समितीने याबाबतचा अहवाल के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाला दिला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुरक्षिततेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे.

‘नॅशनल अ‍ॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायजेशन’ ही समिती लसीकरणानंतरच्या दुष्परिणामांवर संशोधन करते. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली म्हणजेच भारतातील कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर रक्तस्त्राव होणे किं वा रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबतच्या तक्रारींची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणानंतर नागरिकांमध्ये दिसलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. तीन एप्रिलपर्यंत देशात सात कोटी ५४ लाख ३५ हजार ५८१ लसमात्रा देण्यात आल्या. त्यापैकी सहा कोटी ८६ लाख ५० हजार ८१९ मात्रा कोविशिल्ड, तर ६७,८४,५६२ मात्रा कोव्हॅक्सिन लशीच्या देण्यात आल्या. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर २३ हजार दुष्परिणाम नोंदवण्यात आले. त्यांपैकी ७०० (१० लाखांमागे ९.३) गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. गंभीर रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा राष्ट्रीय समितीने घेतला असता २६ जणांच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाल्याची शक्यता समोर आली. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर अशी गुठळी होण्याचे प्रमाण १० लाखांमागे ०.६१ एवढे अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले, तर कोव्हॅक्सिन लशीनंतर असा प्रकार घडल्याची नोंद अद्याप झालेली नसल्याचे या समितीने स्पष्ट के ले आहे. लसीकरणानंतर रक्ताची गुठळी होण्याच्या घटना इंग्लंडमध्ये १० लाखांमागे चार तर जर्मनीत १० एवढय़ा आहेत.

करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर २० दिवसांत रक्तामध्ये गुठळ्या होण्याच्या शक्यतेबाबत जनजागृती करण्यासाठी के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. लस (विशेषत: कोविशिल्ड) घेतल्यानंतर श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, हात-पाय दुखणे, सूज, लस टोचलेल्या जागेभोवती अनेक लाल ठिपके , तसेच उलटय़ा, पोटदुखी आदी लक्षणे दिसल्यास तातडीने लस घेतलेल्या के ंद्रावर कळवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयातर्फे  करण्यात आले आहे.