05 August 2020

News Flash

अजित दादा मी तुमचा सदैव आभारी राहीन, रितेश झाला भावूक

महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील घोषणा केली असून कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला दिली आहे. यासंदर्भात विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवारांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.

मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ वडिलांचं नाव देण्यात येणार असल्यामुळे रितेश देशमुख भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याने आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ‘श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा,’ असं रितेश देशमुख याने ट्विट केले आहे.


मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.’

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 11:29 am

Web Title: ritesh deshmukh thank you to ajit pawar nck 90
Next Stories
1 VIDEO: बालगृहातील मुलांसाठी गृहमंत्र्यांनी स्वत: चुलीवर बनवला चहा
2 “मोदींशी तुलना होणे हा शिवाजी महाराजांचा सन्मानच”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
3 गुड न्यूज : राज्यात लवकरच आठ हजार पदांची पोलीस भरती
Just Now!
X