News Flash

रो रो सेवेचा मुहूर्त टळणार

जेटी परिसरातील गाळ काढणे, जेटीला जोडणाऱ्या मार्गाचे जोडणी करणे हे काम अद्याप बाकी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा अशी सागरी माग्रे रो – रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडवा येथे टर्मिनल बांधण्यात टर्मिनल बांधण्यावचे काम अंतिम टप्यारोंदत आहे.  हे काम पूर्ण होवून १ एप्रिल पासून हि रो रो सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिलेल्या मुदतीत का पुर्ण होऊ शकल्याने रो रो सेवेचा मुहूर्त टळणार आहे.

रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. त्याच बरोबर पर्यटनच्या दृष्टीने तो महत्वाचा जिल्हा आहे. अलिबाग हे पर्यटन केंद्र आहे. मुंबईहून येथे येण्यासाठी जलप्रवास हाच सोपा मार्ग आहे. गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का – रेवस हे दोन मार्ग आहेत.  या मार्गाने येणार्यास पर्यटकांना स्वतचे वाहन घेऊन येणे शक्य  होत नाही. त्यामुळे मुंबई – मांडवा अशी रो – रो  सेवा सुरू करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात होती.

केंद्र शासनाच्या सागरमाला योजनअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्रक मेरीटाईम बोर्ड) हे काम करत आहे. १३५ कोटी २९ लाख रूपयांची प्रशासकीय मान्य ता मिळाली होती . जुलै २०१६ मध्ये या कामाचे कार्यादेश देण्यात आले.  मांडवा येथील रो – रो टर्मिनलमध्ये २१४ बाय १० मीटरची जेट्टी , ३० बाय ३० चा प्लॅटफॉर्म, २० बाय २२ मीटरचा तरंगता तराफा (फ्लोटिंग प्लांटून )  ३६० मीटर लाटरोधक भिंत (ब्रेकवॉटर ) व १००बाय ११५  मीटर लांबीचा वाहन तळ बांधण्यात येत आहे. हे काम वेगात सध्या अंतिम टप्प्यात आहे. सून ब्रेकवॉटरचे काम पुर्ण झाले आहे. कामाची मुदत जुलै २०१८ पर्यंत असली तरी १ एप्रिल पासून हि सेवा सुरु होईल अशी आशा केंद्रीय जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती.

सध्या मांडवा येथे रो रो टर्मिनल उभारणीचे काम रात्रंदिवस सुरु असले तरी दिलेल्या १ एप्रिल पुर्वी हे काम पुर्ण करणे जवळपास अशक्य ठरणार आहे. जेटी परिसरातील गाळ काढणे, जेटीला जोडणाऱ्या मार्गाचे जोडणी करणे हे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे रो रो सेवा सुरु होण्यासाठी आणखिन काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

 प्रकल्पाचे फायदे..

मांडवा – भाऊचा धक्का अशी रो – रो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईहून अलिबागला स्वतचे वाहन रो रो सेवेने घेऊन येणे शक्या होणार आहे. सध्या प्रवासी किंवा पर्यटकांना पनवेल मार्ग यावे लागते. हा वळसा चुकणार आहे. याशिवाय मांडवा ते गेटवे अशी जी बोटसेवा सुरू आहे ती बारमाही होवू शकणार आहे  यामुळे केवळ अलिबाग किंवा मुरूडच्याच नव्हे तर संपूर्ण कोकणच्या पर्यटनाला चालना मिळू शकणार आहे. राज्यात प्रथमच सुरु होणारया या प्रकल्पाची रायगडकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 1:08 am

Web Title: ro ro car ferry from mumbai to alibaug likely to get delay
Next Stories
1 विजेचा धक्का लागून मायलेकासह तिघांचा मृत्यू, सांगलीतील घटना
2 जाणून घ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या त्या बारा रत्नांबद्दल
3 लातुरात मुलीला नाव दिले ‘स्वच्छता’ !
Just Now!
X