06 July 2020

News Flash

औरंगाबाद जिल्ह्यातील भीषण अपघातात सहा जण ठार

औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर गावानजीक असलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

| April 5, 2015 11:34 am

औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर गावानजीक असलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओ गाडी व ट्रकने एकमेकांना समोरून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या समोरीला बाजूचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जण ठार झाले आहेत.
या अपघातात चौघे जखमी झाले असून, त्यांच्यावर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये तीन महिला व एक लहान मुलीचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. मात्र, आता अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. कन्नड तालुक्यातील अंधानेर गावातील शेख कुटुंबीय गोव्याला मुलीच्या उपचारासाठी गेले होते. उपचार करून हे सर्व गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात त्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2015 11:34 am

Web Title: road accident in aurangabad
टॅग Aurangabad
Next Stories
1 एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम
2 टोल आकारणीवरून कळंबा टोलनाक्यावर हल्ला
3 खा. गांधी यांच्यामुळे जिल्हय़ाची बदनामी
Just Now!
X