24 September 2020

News Flash

आंबोली घाटात कार कोसळली, कुटुंब बचावले

या अपघातात सुदैवाने लहान मुलासह कुटुंब बचावले.

सोलापूर येथील एमएसईबीचे अभियंता कुटुंबासह गोवा येथे व्हॅगनर गाडीने जात असताना आंबोली घाटातील कुंभेश्वर वळणावर सुमारे २५ फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात सुदैवाने लहान मुलासह कुटुंब बचावले. सावंतवाडी पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोग्य सुविधासाठी कुटुंबाला रुग्णालयात दाखल केले.

सोलापूर येथील विज मंडळ अभियंता रामचंद्र कानडे पत्नी तसेच चार व एक वर्षांच्या मुलासह व्हॅगनर एमएच१३ बीएन ३१२८ या गाडीने गोवा येथे पर्यटनासाठी जात होते.

आंबोली घाट उतरत असताना कुंभेश्वर येथे रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान वळणावर कार कंट्रोल झाली नसल्याने २५ फुट खोल दरीत कोसळली. रस्त्याच्या खाली कार कोसळली तेव्हा रात्र होती. रामचंद्र कानडे गंभीर होते. पण त्यांच्या पत्नीने शंभर नंबर्सवर संपर्क साधला.

पोलिसांना शंभर नंबर्सवरून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर पाटील सह सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, उपनिरीक्षक गीरी देसाई तसेच आंबोली दूरक्षेत्राचे कदम, तेली, देसाई असे पोलीस दोन्ही बाजूंनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ दोन लहान मुलासह पती-पत्नीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

सोलापूर ते गोवा असा प्रवास करणाऱ्या या दांम्पत्यावर रात्रीच्या वेळी आलेला हा दुर्दैवी प्रसंगाला पोलिसांनी तात्काळ जावून साथ केल्याने या कुटुंबातील चार व एक वर्षांच्या मुलासह पती-पत्नी सुखरूपपणे बाहेर पडली. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, या अपघातात खोलवर कार कोसळली होती, पण अपघातातील जखमी पत्नीने शंभर नंबर्सवर संपर्क साधल्याने पोलिसांनी धाव घेऊन रात्रीच्या वेळी त्यांना वाचविण्यात यश आले.

सावंतवाडी पोलीस स्टेशन व आंबोली दूरक्षेत्र पोलीस धावले, त्यामुळे  सुदैवाने अपघातातील हे कुटुंब सुखरूप बचावले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:17 am

Web Title: road accidents in maharashtra
Next Stories
1 विकास नियंत्रण नियमावली फुटली ?
2 बंडखोरीमुळे अकोल्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
3 पोलीस ठाण्यात मतदारांना मिळणार उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती; नाशिक पोलिसांचा उपक्रम
Just Now!
X