एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांची माहिती घेण्याबरोबरच केलेल्या कामांचा आढावा, कामांतील त्रुटी या संदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींची मंगळवार २ डिसेंबर रोजी कोल्हापुरात बैठक होत आहे.
कोल्हापुरातील कोटय़वधी रुपयांचा एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण करण्याची व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत मोठया प्रमाणात आंदोलने होऊ लागल्यानंतर दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून पलायन केले. टोलविरोधी कृती समितीने रस्त्याचा दर्जा, युटिलिटी शििफ्टग, विजेचे दिवे, रस्त्याकडील चॅनेल, अपूर्ण कामे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. ही सर्व कामे करण्याबाबत महापालिकेनेही वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शििफ्टग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. केलेल्या कामांचा दर्जा व टोलबाबत आलेल्या तक्रारींबाबत या बठकीत चर्चा होणार आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार आहे.