१० घरफोड्या करणाऱ्या चोराच्या मुसक्या पोलिसांनी अखेर आवळल्या आहेत. राजू तुकाराम सुतार (वय २८) असं या चोरट्याचं नाव आहे. घरफोडी करण्यासाठी दोन वर्षांची शिक्षा भोगूनही त्याची घरफोडी करण्याची सवय काही सुटली नाही. राजूला पुन्हा एकदा कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सरकारी पिस्तुल, राऊंड, सोन्याचे दागिने असा १० लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजूने १० घरफोड्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात घरफोड्यानी धुमाकूळ घातला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिले . पोलीस पथक शोध घेत असता जुना शिंगणापूर नाका येथून राजू हातात पिशवी घेऊन जात होता  त्याला हटकले असता तो पळून गेला. त्याला निवास पाटील व रोहित मर्दाने यांनी पाठलाग करून पकडले. त्याने राजू सुतार असे नाव असल्याचे त्याने सांगितले.
त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने रंकाळा स्टँड जवळील गंभीर घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याला तेव्हा अटक केली होती.
राजू सुतार याला लहानपणापासून चोरी करण्याची सवय आहे. कोल्हापूर, सांगली, रायगड जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे ७ गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber arrested for 10 robberies in kolhapur scj
First published on: 23-07-2019 at 16:26 IST