News Flash

रोहिणी एकनाथ खडसे करोना पॉझिटिव्ह

रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करुन दिली माहिती

फोटो सौजन्य- रोहिणी खडसे (ट्विटर अकाऊंट)

जळगाव जिल्हा बँकेच्या तथा माजी महसूल-कृषीमंत्री श्री एकनाथरावजी खडसे यांच्या कन्या सौ.रोहिणी खडसे-खेवलकर यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा ही देखील करोना पॉझिटिव्ह असून दोघींनाही जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ.मिनाज पटेल, डॉ.सुयोग चौधरी, डॉ.गौरव पाटील, डॉ.प्रांजल खेवलकर, डॉ. मोइज देशपांडे, डॉ.प्रितेश नाईक, डॉ.अभिषेक ठाकूर, डॉ.प्रभाकर पाटील, व इतर डॉक्टर उपचार करीत आहेत.

रोहिणी खडसे यांचं संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन’
माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने मागील ७-८ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होईन.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपाला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षासाठी काम करावं म्हणून त्या गेल्या काही दिवसांपासून जळगावातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्या मुलीचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 3:45 pm

Web Title: rohini eknath khadse tested corona positive scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …मग आता मंदिरे उघडण्याच्या प्रश्नाबाबत श्रेयवाद का? – दरेकर
2 “सिद्धिविनायक मंदिरात ढोल वाजवत जाणार, जनतेच्या दबावामुळे सरकारचा दारुण पराभव”
3 “शिवसेना नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल”
Just Now!
X