News Flash

जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी रोहिणी खडसे

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सर्वपक्षीय गटाने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.

| May 17, 2015 05:02 am

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सर्वपक्षीय गटाने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. अध्यक्षपदी रोहिणी खडसे तर उपाध्यक्षपदी किशोर पाटील यांची अविरोध निवड झाली. जिल्हा बँकेच्या इतिहासात अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे.
बँकेची निवडणूक अविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यात खडसे यांनी विरोधकांना आपली ताकद दाखविली. राष्ट्रवादी व मित्रपक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवत महसूलमंत्री खडसे यांनी एकहाती सत्ता मिळवली आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. उपाध्यक्षपदी आ. किशोर पाटील यांची अविरोध निवड झाली. पण, उपाध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी त्यावर दावा सांगितला होता. यामुळे अध्यक्ष पदा पेक्षा उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता निर्माण झाली. शुक्रवारी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे अध्यक्षपदी रोहिणी खडसे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याबाबतची औपचारिक घोषणा शनिवारी करण्यात आली. सकाळी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 5:02 am

Web Title: rohini khadse jalgaon district bank
Next Stories
1 महाराष्ट्रात आढळल्या चतुरांच्या १३४ जाती
2 क्रिकेटच्या वादातून धुळ्यात दंगल; दोन ठार
3 चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X