News Flash

हिंगणघाट जळीतकांड; पीडितेच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी केलं आवाहन

वर्धा जळीतकांडांतील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे.

हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याची घटना घडली. या घटनेनं महाराष्ट्र हादरला. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झगडत होती. डॉक्टरांचं पथक अहोरात्र धडपड होतं. पण, सोमवारची सकाळ उजाडली अन् पीडितेची प्राणज्योत कायमची मालवली. हिंगणघाटमधील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडं हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नागरिकांना आवाहन केलं.

हिंगणघाटमध्ये आरोपीनं पेट्रोल टाकून पेटवून दिल्यानं पीडिता भाजली होती. नागपूरमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. “धक्कादायक, संतापजनक घटनेची अखेर अत्यंत वेदनादायी झाली. वर्धा जळीतकांडांतील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे. पीडितेच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण समाजातील विकृतीची राख करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हिच पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल,” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

आणखी वाचा – हा मृत्यू नव्हे, हत्याच; हिंगणघाट जळीतकांडावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. “अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 10:31 am

Web Title: rohit pawar appeal to people after death of burn victim bmh 90
Next Stories
1 हिंगणघाट जळीतकांड: “महाराष्ट्रात कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?”
2 लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही; धनंजय मुंडेंनी दिला इशारा
3 हिंगणघाट जळीतकांड: पीडितेच्या मृत्यूनंतर नेतेही संतापले; म्हणाले…
Just Now!
X