27 February 2021

News Flash

खेळणीच्या दुकानाने जागा केला आमदारांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट

महिनाभर राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू होती

राज्यात महिनाभरापासून अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. या राजकीय नाट्याला महाविकास आघाडीनं सरकार स्थापन करून पूर्णविराम दिला. महिनाभर राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू होती. सत्तास्थापनेनंतर आमदार काहीसे निवांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबतचा खेळण्याच्या दुकानातील फोटो पोस्ट करत भावनिक प्रसंग शेअर केला आहे.

रोहित पवार आणि विश्वजीत कदम हे एकाच गाडीतून जात असताना त्यांना खेळण्याचं दुकान दिसलं आणि त्यांच्यामधील बाप जागा झाला. निवडणुकीच्या काळात दिवसरात्र झालेल्या धावपळीमुळे कुटुंबाला वेळ देऊ न शकणाऱ्या या आमदारांनी स्वत:च्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी त्यांना खेळणी खरेदी केली. रोहित पवार यांनी ह्या सर्व प्रसंगाचं वर्णन आपल्या पोस्टमध्ये केलं आहे.

काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवादिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.
आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 2:16 pm

Web Title: rohit pawar facebook post dr vishwajeet kadam toy shop nck 90
Next Stories
1 सब लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट
2 Video: …आणि त्या क्षणी कोब्राच्या तावडीतून निसटलं मुंगूस
3 टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना जबर दणका, रिचार्ज प्लॅन्स दुप्पटीने महाग
Just Now!
X