News Flash

इंधन दरवाढीविषयी रोहित पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार, म्हणाले……

दोन दिवस इंधनांचे दर स्थिर राहिल्याबद्दल रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत

आमदार रोहित पवार यांनी मांडली भूमिका

देशातल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. बरं, या दरांमध्ये घट तर होत नाहीच, मात्र त्यांच्यात दररोज वाढच होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अक्षरशः त्रस्त झाला आहे. देशाच्या राजकारणात मात्र या विषयावरुन टीकाटिप्पणी करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही जण सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत, तर काही ठिकाणी या दरवाढीविरोधात आंदोलनही सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आता इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.


आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना… यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:58 am

Web Title: rohit pawar new tweet about petrol diesel price hike modi government vsk 98
Next Stories
1 नाशिकनंतर आता राज ठाकरे पुण्यात; पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु
2 ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना
3 गोष्ट दहावी नापास तरुणाची! जिद्दीच्या जोरावर MPSC त मिळवलं यश; बनला अधिकारी
Just Now!
X